Ad will apear here
Next
मोहन जोशी दिसणार इरसाल पुणेकराच्या भूमिकेत
‘६६ सदाशिव’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित

पुणे : १४ विद्या आणि ६४ कलांबद्दल आपल्याला माहित आहे, अलीकडच्या काळात जाहिरात ही ६५ वी कला म्हणून नावारूपाला आलेली आहे. यात आता आणखी एका कलेची भर पडली असून, ही ६६ वी कला नेमकी कोणती? हे सांगण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी ‘६६ सदाशिव’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

योगेश देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘६६ सदाशिव’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून, यामध्ये मोहन जोशी यांच्या विविध भावमुद्रा बघायला मिळतात. एका पोस्टर मध्ये ‘६६ व्या कलेत पारंगत होण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम!’अशा आशयाचे एक पुस्तक मोहन जोशी यांच्या हातात दिसते. या पोस्टर्समुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली असून, हा चित्रपट, पुण्याच्या काही भन्नाट स्वभाव-गुणधर्मांचं हटके दर्शन घडवणार असे दिसते.

‘६६ सदाशिव’ हा ‘पुणे टॉकीज प्रा. लि.’ यांची पहिली निर्मिती असून, हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाला नरेंद्र भिडे यांचे संगीत लाभले असून, छायांकन अजित रेड्डी यांचे आहे. मोहन जोशी यांच्यासह आणखी कोणते कलाकार चित्रपटात आहेत, हे जाणून घेण्यासाठी थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे. 

६६ व्या नव्या कोऱ्या कलेचा शोध घेऊन, तिचे शास्त्र, रचना आणि आपल्या प्रत्येकाच्या जगण्यातलं या कलेचे अविभाज्य स्थान समजावून सांगणारा, भन्नाट व्यक्तिरेखांनी नटलेला हा कलाविष्कार ‘६६ सदाशिव’ हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZTDBZ
Similar Posts
‘६६ सदाशिव’ चित्रपटाच्या पोस्टर, म्युझिकचे अनावरण पुणे : प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणाऱ्या ‘६६ सदाशिव’ या चित्रपटाचा पोस्टर, टीजर आणि म्युझिकचे अनावरण दिमाखात सोहळ्यात नुकतेच करण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती पुणे टॉकिज प्रायव्हेट लिमिटेड यांची असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे.
दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन पुणे : राजीव गांधी स्मारक समिती, मिशन राजीव आणि पुणे शहर काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्या हस्ते कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला
पुण्यात रंगला ‘हॅवमोर आइस्क्रीम मिर्ची म्युझिक अॅवॉर्ड’ सोहळा पुणे : संगीत, नृत्याच्या साथीने रंगलेला ‘हॅवमोर आइस्क्रीम मिर्ची म्युझिक अॅवॉर्ड’ सोहळा नुकताच रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मोठ्या जल्लोषात पार पडला. २०१८ हे वर्ष मराठी संगीत क्षेत्रासाठी आश्वासक ठरले, या सोहळ्यात दिग्गजांचा गौरव करत मराठी संगीत क्षेत्राला मानाचा मुजरा करण्यात आला.
अभिनेते योगेश देशपांडेंचे चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण पुणे : जाहिरात क्षेत्रातील कमर्शियल आर्टिस्ट, चित्रकार, निवेदक, संहिता लेखक, अभिनेता असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले योगेश देशपांडे यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण होत असून, ‘६६ सदाशिव’ असे त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे नाव आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language